Ayurveda

निरामयमनः निरामयशरीरे...
The mind-body connection is a cornerstone of Ayurveda.

Panchakarma

An ounce of prevention is worth a pound of cure! But where can we find that ounce of potion for immortality?

पंचकर्मामध्ये खालील 5 कर्मांचा अंतर्भाव होतो

हे पंचकर्म करण्यापूर्वी स्नेहन म्हणजे संपूर्ण शरीराला मालिश (मसाज} करणे व स्वेदन म्हणजे सर्व शरीराला वाफ(steam) हे कर्म केल्या जातात . प्रत्येक पेशंटला हे पाचही पंचकर्म केलेच पाहिजे असे आवश्यक नाही तर पेशंटची प्रकृती, वय, ऋतू, जुना आजार या सर्वांचा सारासार विचार करून वैद्य पेशंटला कुठला उपचार घ्यायचा हे ठरवितात . वात, पित्त व कफ यापैकी एखादाही दोष वाढलेला किंवा कमी झालेला असल्यास शरीरात आजार किंवा रोग निर्माण होत असतात.

पंचकर्म करताना त्या पेशंटची शक्ती पाहिली जाते तसेच रुग्णांची उपचार स्विकारण्याची शारीरिक क्षमता तपासली जाते व वैद्यांना योग्य वाटले तरच पाचन औषधे आधी देऊन स्नेहन, स्वेदन ही पूर्वकर्म पंचकर्म केल्या जातात.

थोड आयुर्वेदा विषयी

आरोग्यम् धनसंपदा ‘ अगदी अनादी काळापासून तर आजतागायत विश्‍वातील कोणत्याही व्यक्तीला ‘ जीवनातील सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती ? ‘ हा प्रश्न विचारला तर त्याचे एकच उत्तर असते ते म्हणजे ‘ स्वतःचे व आपल्या प्रियजनांचे आरोग्य ‘ हे त्रिकालाबाधित सत्य आहे आणि या आरोग्याचीच काळजी घेणारे शास्त्र म्हणजे ‘ आयुर्वेद ‘ होय.

स्वस्थस्य स्वास्थ रक्षणम ।
आतुरस्य विकार प्रशमनच ।। चरक

या महर्षी चरक ऋषीं नुसार स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचे रक्षण तर करणेच आहे पण रोग्याला रोगमुक्त करणे हे आयुर्वेदाचे मुख्य उद्दिष्ट आहे. आज आपण विज्ञानाच्या माध्यमातून वेगवेगळ्या आजारावर नानाविध औषधे वापरतो व त्या रोगांच्या निवारणार्थ प्रयत्न करतो परंतु जशी औषधे निर्माण होत आहे त्याच प्रमाणात नवनवीन तसेच गंभीर परिणाम होणारे आजारसुद्धा तयार होत आहेत. हे दुष्परिणाम (Side effect) नाही तर काय आहे ? शरीराला कोणतेही दुष्परिणाम ( Side effect) न होऊ देता शरीरात उत्पन्न झालेल्या कोणत्याही आजाराचे समूळ उच्चाटन करण्याचे एकमेव शास्त्र म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीत सुमारे ५००० वर्षाचा दैदिप्यमान इतिहास लाभलेले ‘ आयुर्वेदशास्त्र ‘ ( Ayurveda ) हे होय.

आजही जगाच्या पाठीवर भारताच्या तुलनेत प्रगत समजल्या जाणाऱ्या व अतिशय विरळ लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये कोरोना महामारीची संख्या व मृत्युदर भारतापेक्षा जास्त आहे त्याला कारण म्हणजे बहुतांशी भारतीयांवर असणारा आयुर्वेदिक जीवन शैलीचा प्रभाव आपली संस्कृती, आपली दिनचर्या, ऋतुचर्या आणि प्रतिकारक्षमता ( Immunity ). आयुर्वेद म्हणजे एक शास्त्र नसून आपली जीवनपद्धती आहे. हे डॉ. खुरपे दाम्पत्याने जगाला आपल्या आचरणातून व उभारलेल्या श्री विश्वेश्वर आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर च्या माध्यमातून पटवून दिले आहे. त्यामुळे ते आपल्याला आपलेसे वाटते. आता जगभरातही आयुर्वेद उपचाराचे महत्त्व खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. येथे येणारा प्रत्येक जण जीवन जगण्याची एक नवीन दृष्टी घेऊन परतत असतो. आपली व आपल्या प्रियजनांची आरोग्यसंपदा वाढवीत असतो. त्यामुळे वाट कसली बघताय? आजच भेट दया आपल्या श्री विश्वेश्वर आयुर्वेदिक क्लिनिक व पंचकर्म सेंटरला.

Ayurvedic Clinic & Panchkarma Center in Sindkhed raja Buldhana

Our Services

We offer health consultations, therapeutic massages, deep detoxification techniques, personalised diets, comprehensive workshops, certificate courses and training in yoga, lifestyle transforming experiences and much more.

Ayurveda & Yoga Consultation

The consultation that addresses overall health and wellbeing.

Panchakarma
( Detox )

Seasonal cleansing & detox treatments to cure, maintain and heal.

डॉ. विलास खुरपे

BAMS , D.YA Pune

डॉ. विलास डिगांबरआप्पा खुरपे यांनी बी ए एम एस हे ग्रा. आ. महा . पातूर, अकोला येथे पूर्ण करून पुणे येथे Diploma in Yog & Ayurveda मध्ये विशेष प्राविण्य मिळवले आहे तसेच त्यांनी पुणे येथील जगप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य समीर जमदग्नी सर यांच्या मार्गदर्शनात काही वर्ष राहून आयुर्वेदा विषयी सखोल ज्ञानार्जन केले आहे. तसेच दरवर्षी होणारी विविध आयुर्वेद संमेलने, Conference , Online Discussion मध्ये सहभागी राहून  तज्ञ आयुर्वेदिक वैद्यांच्या संपर्कात असतात.
डॉ. विलास खुरपे यांनी मागील  १८ वर्षापासून श्री विश्वेश्वर क्लिनिक  व अनेक असाध्य समजल्या जाणाऱ्या रोगांवर यशस्वीपणे आयुर्वेदिक उपचार (Ayurvedic Treatment) रुग्णांना देऊन त्यांना व्याधीमुक्त केले आहे. एखादा आजार होऊन त्यावर उपचार केल्यापेक्षा आपली दैनंदिन दिनचर्या व ऋतुचर्या अशी असावी की आपली रोगप्रतिकारक्षमता (Immunity) वाढवून आपण कोणत्याही आजाराला बळी पडू नये या गोष्टीवर ठाम विश्वास असल्यामुळे डॉ. विलास खुरपे हे रोग्यांवर फक्त इलाज करत नाहीत तर त्यांचे दैनंदिन आहार, विहार, व्यायाम पथ्ये व जीवनशैली सुधारण्याचे (Lifestyle Changes) अनेक उपाय सांगून रुग्णांना नेहमीच मार्गदर्शन करीत असतात त्यांच्या मार्गदर्शनामुळे दर महिन्याला रूग्ण म्हणून येणारे पुढे सहा-सहा महिने, काही वर्ष रुग्ण म्हणून दवाखान्याची पायरी सुद्धा चढत नाहीत त्यामुळेच त्यांनी रुग्णांचा विश्वास जिंकून त्यांच्या मनामध्ये अढळ स्थान निर्माण केले आहे.

डॉ. मंजूश्री विलास खुरपे

BHMS (MUHS Nashik)

घरातील स्त्री हा कुटुंबाचा मुख्य आधार असते. तीचे आरोग्य चांगले असले तर सर्व कुटुंबाचे आरोग्य चांगले हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून डॉ. मंजूश्री विलास खुरपे यांनी त्यांचे शिक्षण K.S.P.M होमिओपॅथिक कॉलेज लातूर येथे पूर्ण करून गेल्या 15 वर्षापासून श्री विश्वेश्वर क्लीनिक येथे होमोपॅथिक (Homeopathic) प्रॅक्टिस सुरु केली आहे व विशेषत्वाने महिला रुग्णांवर आयुर्वेदिक पंचकर्माच्या माध्यमातून उपचार करत आहेत. मुलींच्या व स्त्रियांच्या आरोग्य शिक्षणासाठी व सबलीकरणासाठी त्यांनी अनेक शाळा, कॉलेज या ठिकाणी विविध शिबिरे तसेच सार्वजनिक कार्यक्रमातून मार्गदर्शन करून सुदृढ समाज निर्मितीमध्ये मोलाचा हातभार लावला आहे.

Open chat