श्री विश्वेश्वर

आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर

Home Basti ( बस्ती )

बस्ती

बस्ती चिकित्सेला आयुर्वेदामध्ये अर्धी चिकित्सा म्हणतात एवढे महत्व बस्ती चे आहे. गुदमार्गामधून ( संडासच्या ) तूप, तेल, काढा हे द्रव पदार्थ सोडली जातात. त्याला बस्ती म्हणतात. साध्या भाषेत त्याला एनिमा देणे असेही म्हणू शकतो.
बस्तीसाठी लागणारा असे रोज १ ते १ १/२ दिड तास कालावधी – ८ दिवस , १५ दिवस, २१ दिवस , आजारानुसार व्यक्तीच्या प्रकृतीनुसार ठरवितात.
बस्ती कर्म हे विशेषतः पावसाळ्यात ( जुलै,ऑगस्ट,सप्टेंबर ) महिन्यात तसेच आजारानुसार केव्हाही करता येते.

बस्ती कुणी करून घ्यावे

  • वातरोग विशेषतः पक्षाघात ( Paralysis ), मुखवक्रता ( Facial Paralysis / Bell’s palsy), कंपवात ( Parkinsonism ), हातपायाला मुंग्या ( Tingling) येणे, बधिरता येणे यासाठी बस्ती उपयोगी आहे
  • जुनाट संधिवात ( Osteoarthritis ), आमवात ( Rheumatoid Arthritis ), इ. वातविकारावर बस्तीचे चांगले परिणाम दिसून येतात.
  • उंची वाढविणे व थायराईड इत्यादी आजारासाठी बस्तीचा चांगला परिणाम येतो.
  • मणक्याचे विकार म्हणजे मानदुखणे ( Cervical Spondylosis ), कंबरदुखणे ( Lumbar Spondylosis ), मणक्यात ग्याप असणे ( Prolapse of Disc ), मणक्याची गादी सरकणे ( Disk Protrusion ), पाठ दुखणे ( Backace ), इ. मणक्याच्या विकारातपण बस्तीचे चांगले परिणाम पाहावयास मिळतात.
  • मासीक पाळीचे आजार, पाळी अनियमीत येणे ( Irregular Menses, PCOD ) ओटीपोटी दुखणे ( Dysmenorrhea ), इ. स्त्रियांच्या आजारात बस्ती गुणकारी ठरते.
Open chat