Ayurveda

Home आयुर्वेदा विषयी

थोड आयुर्वेदा विषयी

आरोग्यम् धनसंपदा ‘ अगदी अनादी काळापासून तर आजतागायत विश्‍वातील कोणत्याही व्यक्तीला ‘ जीवनातील सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती ? ‘ हा प्रश्न विचारला तर त्याचे एकच उत्तर असते ते म्हणजे ‘ स्वतःचे व आपल्या प्रियजनांचे आरोग्य ‘ हे त्रिकालाबाधित सत्य आहे आणि या आरोग्याचीच काळजी घेणारे शास्त्र म्हणजे ‘ आयुर्वेद ‘ होय.

स्वस्थस्य स्वास्थ रक्षणम ।
आतुरस्य विकार प्रशमनच ।। चरक

या महर्षी चरक ऋषींनी नुसार स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचे रक्षण तर करणेच आहे पण रोग्याला रोगमुक्त करणे हे आयुर्वेदाचे उद्दिष्ट आहे. आज आपण विज्ञानाच्या माध्यमातून वेगवेगळ्या आजारावर नानाविध औषधे वापरतो व त्या रोगांच्या निवारणार्थ प्रयत्न करतो परंतु जशी औषधे निर्माण होत आहे त्याच प्रमाणात नवीन नवीन तसेच गंभीर परिणाम होणारे आजारसुद्धा तयार होत आहेत. हे दुष्परिणाम (Side effect) नाही तर काय आहे ? शरीराला कोणतेही दुष्परिणाम ( Side effect) न होऊ देता शरीरात उत्पन्न झालेल्या कोणत्याही आजाराची समूळ उच्चाटन करण्याचे एकमेव शास्त्र म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीत सुमारे ५००० वर्षाचा देदिप्यमान इतिहास लागलेले ‘ आयुर्वेदशास्त्र ‘ ( Ayurveda ) हे होय.

आजही जगाच्या पाठीवर भारताच्या तुलनेत प्रगत समजल्या जाणाऱ्या व अतिशय विरळ लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये कोरोना महामारीची संख्या व मृत्युदर भारतापेक्षा जास्त आहे त्याला कारण म्हणजे बहुतांश भारतीयांवर असणारा आयुर्वेदिक जीवनशैलीचा प्रभाव, आपली संस्कृती, आपली दिनचर्या, ऋतुचर्या आणि प्रतिकारक्षमता ( Immunity ). आयुर्वेद म्हणजे एक शास्त्र नसून आपली जीवनपद्धती आहे. ते डॉ. खुरपे दाम्पत्याने जगाला आपल्या आचरणातून व उभारलेल्या श्री विश्वेश्वर आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर च्या माध्यमातून पटवून दिले आहे त्यामुळे ते आपल्याला आपलेसे वाटते. आता जगभरातही आयुर्वेद उपचाराचे महत्त्व खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे येथे येणारा प्रत्येक जण जीवन जगण्याची एक नवीन दृष्टी घेऊन परतत असतो व आपली व आपल्या प्रियजनांची आरोग्यसंपदा वाढवीत असतो. त्यामुळे वाट कसली बघताय? आजच भेट दया आपल्या श्री विश्वेश्वर आयुर्वेदिक क्लिनिक व पंचकर्म सेंटरला.

Open chat