Nasya (नस्य)
आयुर्वेदिक औषधांनी सिद्ध तेल, तुप औषधी डोक्यामध्ये जाणे अपेक्षित असेल तर ते नाका मधून घातले जाते त्याला नस्य असे म्हणतात. कारण आयुर्वेदानुसार नासा ही शिरसो द्वारम म्हणजे नाक म्हणजे मस्तकाचे द्वार आहे.
कधी करता येते
विशेषतः वसंत ऋतु मध्ये करतात परंतु आजारानुसार दोषाची अवस्था बघून कधीही करता येते.
कोणासाठी आवश्यक आहे
- सर्व प्रकारच्या शिरो रोगासाठी (मस्तिष्क रोग), जुनाट डोकेदुखी, जुनाट सर्दी यासाठी, कान घसा इत्यादी च्या आजारासाठी, अस्पष्ट बोलणे मूक वक्रता यासाठी.
- डोळ्यांचे विकार, कानातून आवाज येणे, निद्रानाश (झोप न येणे ), फिट येणे, केस कळणे
मान दुखणे - स्मृती वर्धन यासाठी सायनोसायटिस(sinusitis),वारंवार सर्दी असणे यासाठी नस्य उपयोगी आहे