श्री विश्वेश्वर

आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर

Home जलौका वचरण (लीच थेरपी)

जलौका वचरण (लीच थेरपी)

शरीरा मधून रक्त काही ठराविक मात्रेमध्ये काढणे याला रक्तमोक्षण म्हणतात. रक्तमोक्षण पित्ताच्या व्याधींसाठी तसेच दूषित रक्तामुळे होणाऱ्या व्याधींसाठी रक्तमोक्षण उपयोगी आहे. रक्तमोक्षण 2 प्रकारे करता येते.
1 सिरावेध-आजार असेल त्याच्या जवळच्या शिरेमधून रक्त काढणे.
2 जळू लावणे-ज्या ठिकाणी त्रास आहे किंवा दूषित भाग आहे त्या ठिकाणी जळू (लीच) लावून रक्त काढतात त्याला जलौका वचरण म्हणतात.

जलौका वचरण कोणी करावे

  • प्रामुख्याने त्वचेचे विकार
  • सोरियासिस ,पांढरे डाग, तारुण्य पिटिका,डोके दुखी, सांधेदुखी व सुजणे,
  • टाच दुखी, नागिन, मुळव्याध, अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून झालेल्या गाठींच्या नसा (varicose veins),
  • मधुमेहाच्या जखमा, डोकेदुखी ,टाचा दुखणे, पायात दुखणे
Open chat