Virechan (विरेचन)
स्नेहन व स्वेदन सात दिवस करून जुलाबाचे आयुर्वेदिक औषधे देऊन जुलाब करून घेणे म्हणजे विरेचन होय. विरेचन हे मुख्यतः हा पित्त विकारासाठी केले जाते.हे शरद ऋतूत म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये करता येते.
विरेचन कोणी करावे
- पित्तविकार ,आम्लपित्त, घशात कडू, आंबट पाणी येणे, छातीत जळजळ होणे ,
- डोके दुखणे, हातापायाची जळजळ, मळमळ ,पोट साफ न होणे ,
- जेवणानंतर लगेच संडासला जावे लागणे,गॅसेस यांनी त्रस्त व्यक्तींनी विरेचन करावे.
- कावीळ ( Jaundice ), पित्ताशयात खडे होणे ( Gallbladder Stone ), अपचन होणे , नागीण, उष्णता वाढणे यासाठी विरेचन उपयोगी आहे.
- अर्धांगवायू ( Paralysis ), कंपवात, मुखवक्रता ( Facial Paralysis ), त्वचा विकारामध्ये शीतपित्त ( अंगावर पित्ताची गाठी येणे Urticaria ), नाकाचा घोळणा फुटणे, पिंपल्स ( Pimples ). सोरिओसिस ( Psoriasis )
- इसब शरीराला खाज येणे इत्यादी साठी विरेचन फायदेशीर आहे
- मुळव्याध, भगंदर, मलबद्धता (बद्धकोष्टता), पुरुष वंध्यत्व म्हणजे शुक्राणूंची वाढ होण्यासाठी उपयोगी
- अंगावर चरबी अधिक असणे, वजन वाढलेले असणे, कोलेस्ट्रॉल वाढणे यासाठी विरेचन उपयुक्त आहे.