श्री विश्वेश्वर

आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर

Home पंचकर्म ही आयुर्वेदिक चिकित्सा

पंचकर्म ही आयुर्वेदिक चिकित्सा

पंचकर्म ही आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीतील एक मुख्य वैशिष्ट पूर्ण उपक्रम आहे. आयुर्वेदामध्ये उपचार हे मुख्यतः दोन प्रकारे केले जातात.

1. शोधन कर्म –पंचकर्म व उप कर्माच्या साह्याने शरिराचे शोधन(स्वछ) करणे होय
2. शमन कर्म– औषधी उपचार गोळ्या, चूर्ण, काढे,तूप,तेल,आसव च्या साहाय्याने आजार कमी किंवा नष्ट करणे

 शोधन – वाढलेल्या दोषांना( वात, पित्त, कफ) शरीरा बाहेर काढणे म्हणजे शोधन होय.
म्हणजे साध्या भाषेत शरीराची सर्विसिंग करणे होय. (Body detoxification). हे पाच प्रकाराच्या (पंचकर्म) कर्माने किंवा क्रियेने करतात.

पंचकर्म ही प्राचीन भारतीय ऋषीमुनींनी शोधून काढलेली उपचार पद्धती होय.
यामध्ये एखादा आजार बरा करण्यासाठी एखादे औषध देऊन शरीरातच आजार जिरून न टाकता तो आजार शरीरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो यामुळे आजार समूळ नष्ट होतो  व तो आजार सहसा परत होत नाही पंचकर्मा मुळे जुनाट व काही असाध्य व्याधी जे इतर पद्धती मध्ये बरे होऊ शकत नाही तसेच औषधाने सुद्धा विशेष फरक पडत नाही.
त्यामध्ये पंचकर्माने लवकर व चांगला फरक पडू शकतो.

Open chat