श्री विश्वेश्वर आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर
आम्ही मागील 18 वर्षाच्या रूग्णसेवेमध्ये रुग्णाच्या दृष्टीने असाध्य (Chronic) असणाऱ्या अनेक आजारावर आयुर्वेदिक व पंचकर्म पद्धतीनी यशस्वीपणे मात करून जो विश्वास संपादन केला तीच खऱ्या अर्थाने आमची 18 वर्षाची कमाई आहे. आमच्या श्री विश्वेश्वर आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर मध्ये येणारा प्रत्येक रुग्ण हा सृष्टीचा एक स्वतंत्र घटक समजून त्याच्या व्यक्तिगत शारीरिक व्याधी समजून घेऊन त्याच्यावर शास्त्रोक्त पद्धतींनी आयुर्वेदिक उपचार केले जातात.
आजच्या धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनशैलीमुळे (Lifestyle Diseases) व्यायामाच्या अभावामुळे , चुकीच्या आहार-विहार पद्धतीमुळे आपण स्वतःहून अनेक आजारांना आमंत्रण देत असतो. बऱ्याच वेळा हे आजार अगदी जुनाट (Chronic) व रोग्याच्या दृष्टीने खूपच त्रासदायक असतात परंतु अशाही आजारांना स्नेहन, स्वेदन, वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण, कटीबस्ती, शिरोधारा व अग्निकर्म यांच्यासारख्या शास्त्रोक्त आयुर्वेदिक उपचार पद्धतींनी व पंचकर्माचा उपयोग करून त्यांना व्याधीमुक्त करण्याचे नैसर्गिक (Natural) उपचार केंद्र म्हणजे श्री विश्वेश्वर आयुर्वेदिक क्लिनिक व पंचकर्म सेंटर होय.
सिंदखेडराजासारख्या ग्रामीण भागात १५ वर्षापूर्वी प्रॅक्टिस सुरू करताना तेथील आर्थिक, मानसिक, शैक्षणिक अडचणी समजून घेऊन लोकांना आयुर्वेदावर विश्वास ठेवायला लावून त्यांच्यामध्ये आयुर्वेदाविषयी जिव्हाळा वाढवून असंख्य रुग्णांना आम्ही उपचारांने बरे केले आहे.
डॉ. विलास खुरपे
BAMS , D.YA Pune
डॉ. विलास डिगांबरआप्पा खुरपे यांनी बी ए एम एस हे ग्रा. आ. महा . पातूर, अकोला येथे पूर्ण करून पुणे येथे Diploma in Yog & Ayurveda मध्ये विशेष प्राविण्य मिळवले आहे तसेच त्यांनी पुणे येथील जगप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य समीर जमदग्नी सर यांच्या मार्गदर्शनात काही वर्ष राहून आयुर्वेदा विषयी सखोल ज्ञानार्जन केले आहे. तसेच दरवर्षी होणारी विविध आयुर्वेद संमेलने, Conference , Online Discussion मध्ये सहभागी राहून तज्ञ आयुर्वेदिक वैद्यांच्या संपर्कात असतात.
डॉ. विलास खुरपे यांनी मागील १८ वर्षापासून श्री विश्वेश्वर क्लिनिक व अनेक असाध्य समजल्या जाणाऱ्या रोगांवर यशस्वीपणे आयुर्वेदिक उपचार (Ayurvedic Treatment) रुग्णांना देऊन त्यांना व्याधीमुक्त केले आहे. एखादा आजार होऊन त्यावर उपचार केल्यापेक्षा आपली दैनंदिन दिनचर्या व ऋतुचर्या अशी असावी की आपली रोगप्रतिकारक्षमता (Immunity) वाढवून आपण कोणत्याही आजाराला बळी पडू नये या गोष्टीवर ठाम विश्वास असल्यामुळे डॉ. विलास खुरपे हे रोग्यांवर फक्त इलाज करत नाहीत तर त्यांचे दैनंदिन आहार, विहार, व्यायाम पथ्ये व जीवनशैली सुधारण्याचे (Lifestyle Changes) अनेक उपाय सांगून रुग्णांना नेहमीच मार्गदर्शन करीत असतात त्यांच्या मार्गदर्शनामुळे दर महिन्याला रूग्ण म्हणून येणारे पुढे सहा-सहा महिने, काही वर्ष रुग्ण म्हणून दवाखान्याची पायरी सुद्धा चढत नाहीत त्यामुळेच त्यांनी रुग्णांचा विश्वास जिंकून त्यांच्या मनामध्ये अढळ स्थान निर्माण केले आहे.
डॉ. मंजूश्री विलास खुरपे
BHMS (MUHS Nashik)
घरातील स्त्री हा कुटुंबाचा मुख्य आधार असते. तीचे आरोग्य चांगले असले तर सर्व कुटुंबाचे आरोग्य चांगले हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून डॉ. मंजूश्री विलास खुरपे यांनी त्यांचे शिक्षण K.S.P.M होमिओपॅथिक कॉलेज लातूर येथे पूर्ण करून गेल्या 15 वर्षापासून श्री विश्वेश्वर क्लीनिक येथे होमोपॅथिक (Homeopathic) प्रॅक्टिस सुरु केली आहे व विशेषत्वाने महिला रुग्णांवर आयुर्वेदिक पंचकर्माच्या माध्यमातून उपचार करत आहेत. मुलींच्या व स्त्रियांच्या आरोग्य शिक्षणासाठी व सबलीकरणासाठी त्यांनी अनेक शाळा, कॉलेज या ठिकाणी विविध शिबिरे तसेच सार्वजनिक कार्यक्रमातून मार्गदर्शन करून सुदृढ समाज निर्मितीमध्ये मोलाचा हातभार लावला आहे.
Awards & Certificates