
Snehan (स्नेहन)
स्नेहन म्हणजे संपूर्ण शरीराला आयुर्वेदिक औषधांनी युक्त चूर्ण, तेल तूप यांनी विशिष्ट पद्धतींनी मसाज करणे होय. तसेच पोटा मधून आयुर्वेदिक औषधांनी सिद्ध केलेले तेल, तूप पोटात घेणे म्हणजे अभ्यंतर स्नेहन होय.
या स्नेहनाने
- त्वचेवरील कोरडेपणा जाऊन त्वचेला मऊपणा, नरमपणा व कोमलता आणता येते.
- स्नायूचा ताठरपणा कमी होऊन स्नायूंची हालचाल सुलभ होते व सांध्या मधून येणारा कटकट आवाज कमी होतो.
- शरीरावरील ताण कमी होऊन मनाची विचार क्षमता वाढते.
- अंगदुखी, सांधेदुखी कमी होऊन शरीरातील वात कमी होतो.
- वमन, विरेचन, बस्ती करण्यापूर्वी स्नेहन करावे लागते.