जलौका वचरण (लीच थेरपी)
शरीरा मधून रक्त काही ठराविक मात्रेमध्ये काढणे याला रक्तमोक्षण म्हणतात. रक्तमोक्षण पित्ताच्या व्याधींसाठी तसेच दूषित रक्तामुळे होणाऱ्या व्याधींसाठी रक्तमोक्षण उपयोगी आहे. रक्तमोक्षण 2 प्रकारे करता येते.
1 सिरावेध-आजार असेल त्याच्या जवळच्या शिरेमधून रक्त काढणे.
2 जळू लावणे-ज्या ठिकाणी त्रास आहे किंवा दूषित भाग आहे त्या ठिकाणी जळू (लीच) लावून रक्त काढतात त्याला जलौका वचरण म्हणतात.
जलौका वचरण कोणी करावे
- प्रामुख्याने त्वचेचे विकार
- सोरियासिस ,पांढरे डाग, तारुण्य पिटिका,डोके दुखी, सांधेदुखी व सुजणे,
- टाच दुखी, नागिन, मुळव्याध, अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून झालेल्या गाठींच्या नसा (varicose veins),
- मधुमेहाच्या जखमा, डोकेदुखी ,टाचा दुखणे, पायात दुखणे